पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 15 जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे,या संदर्भात मंदिर समितीने प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूमुळे 17 मार्च पासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या दरम्यान चैत्री तसेच आषाढी यात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्या.
राज्यात लॉक डाऊनचा कालावधी वाढवलेला असून पंढरपूर शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. नुकतीच आषाढी यात्रा संपन्न झाली असली तरी ती प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली. 17 मार्चनंतर मंदिर समितीने 2 वेळा दर्शन बंदीचा कालावधी वाढवला आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार 30 जूनपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता ही मुदत वाढवून 15 जुलै पर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जुलै रोजी प्राक्षाळ पूजा होणार असून त्यानंतर विठ्ठलाचे online 24 तास सुरू असलेले दर्शनही बंद होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्य अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.