बंद खोलीत मने झाली मोकळी

ना. जयंत पाटलांच्या पुढाकाराने विठ्ठल परिवारातील मतभेद मिटले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवारात असलेल्या मतभेदाना आज तिलांजली देण्यात आली. राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन मतभेद दूर केले. त्यामुळे विठ्ठल परिवारात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून गेल्या महिन्या भरापासून मोठा वाद निर्माण झाला होता. विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके, संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड गणेश पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यातील हा वाद पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यापर्यंत गेला होता.

विधानसभा पोटनिवडणूकीत याचा पक्षाच्या विजयावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हे मतभेद दूर करण्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. आज ( दि.30 मार्च ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ना.जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी विठ्ठल हॉस्पिटल येथे या सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी बंद खोलीत या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांच्यातील वाद मिटवण्यात आले. बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर सर्व पदाधिकारी खुल्या दिलाने बाहेर आले आणि ना. जयंत पाटील यांचा सत्कार केला. तसेच एकत्र फोटो काढून मतभेद मिटल्याचे जाहीर केले. अंतर्गत मतभेद मिटल्याचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!