विठ्ठल परिवारात ऐक्याच्या हाका, आणि कारखान्याच्या हिताच्या आणा-भाका
पंढरपूर : प्रतिनिधी
मागील वर्षभरात झाले गेले विसरून विठ्ठल कारखाना आणि परिवाराच्या भल्यासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचे हाकारे विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी जाहीर मंचावरून दिले. दरम्यान या बैठकीत एका सभासदाने थकीत ऊस बिल देण्याची मागणी केल्यानंतर परिवराच्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बैठकीत काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेवढा अपवाद वगळता परिवाराची ही बैठक उत्साही वातावरणात संपन्न झाली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज दिनांक 3 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कारखान्याचे संचालक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटऊस विलास संदर्भात विचारणा करणाऱ्या सभासदास धक्काबुक्की
यावेळी शेतकरी सभासदांना आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली होती. तुंगत येथील एका तरुण शेतकऱ्याने मंचावर येऊन आपली भूमिका मांडत असताना 2014 पासून आपल्या सातबारा उताऱ्यावर कर्ज काढलेले आहे ते कर्जत काढल्यामुळे आपल्याला कुठलीही बँक दारात उभा करत नाही, असा आरोप केला. त्याचबरोबर आपले थकित बिल मिळावे अशी मागणी केली. त्याच्या या मागणीनंतर मंचावर समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला. तो सभासद मंचावरून खाली आला असता त्याला मारण्यासाठी नंतर कार्यकर्ते यांच्याकडे धावून गेले. यावेळी नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यकर्त्याला सुरक्षितपणे मंचावर नेले व नंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पाठवले.
यावेळी सुरुवातीला अनेक शेतकरी व सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. बहुतांश शेतकरी, सभासदांनी विठ्ठल परिवारामध्ये मागील वर्षभरात जे काही झाले असेल ते बाजूला ठेवून विठ्ठल कारखाना चांगला चालवण्यासाठी, सभासद, शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान केले. यावेळी बोलतांना कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनीही मागील 8 ते 10 महिन्यात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्न चा पाढा वाचून दाखवला. कारखाना सुरू करण्यासाठी पुणे, मुंबई या ठिकाणी प्रयत्न करीत असताना काही लोकांनी जाणीपूर्वक त्यात अडथळे आणले, कारखाना सुरू होणार नाही यासाठी आर्थिक संस्थांकडे चुकीचे पत्रव्यवहार केले, व्यक्तिगत पातळीवर टीका केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपण संस्थेशी प्रामाणिक राहिलो आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मागील वर्षभरात कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहता आले नाही, त्यांच्या अडी अडचणीत, सुख, दुःखात सामील।होता आले नाही, त्याबद्दल त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागितली. विठ्ठल कारखाना सुरू होण्यासाठी आपली दोन पावलं मागे घेण्याची तयारी आहे, चेअरमनपद हे काही आपले ध्येय नाही, ही संस्था सुरू व्हावी यासाठी आपण प्रसंगी मागे सुरू अशी ग्वाही दिली.
कल्याणराव काळे यांनीही यावेळी बोलताना विठ्ठल परिवार एकसंध राहिला तरच तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासद यांचा स्वाभिमान जपला जाईल संस्था चांगली चालली तर कामगार सभासद यांच्या हिताचे आहे त्यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न करूया असे आवाहन केले.