स्वेरीचे प्रमुख प्रा. डॉ.बी पी रोंगे यांनाही लागण
डॉ बी पी रोंगे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना विषाणू ने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात प्रवेश केला असुन कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, कार्यकारी संचालक बोरावके वर्क्स मॅनेजर जाधव यांच्यासह इतर 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.बी पी रोंगे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा रविवारी गाळप हंगाम सुरू झाला. मात्र या कार्यक्रमावर कोरोनाचा प्रभाव दिसून आला. कारण एकाच वेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालक, वर्क्स मॅनेजर सह संचालक भगीरथ भालके हेसुद्धा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. भगीरथ भालके, कार्यकारी संचालक बोरावके यांना सौम्य लक्षणे असली तरीही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, विठ्ठल अभियंत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी पी रोंगे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात अलेल्या लोकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच आयसोलेट झाले आहेत.
सर्वजण लवकर बरे व्हावेत ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🌹🌹🌹