शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त विठ्ठल मंदिरात रुपेरी सजावट
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आज शेवटचा श्रावणी सोमवार, या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विठ्ठल मंदिरात रुपेरी अष्टर च्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
या रुपेरी फुलांमध्ये सावळा विठू आणि रखुमाई यांचे रूप नयन रम्य दिसते आहे. विठ्ठल आणि रखुमाई चा तसाच मनोहारी पोषाख सावळे सौंदर्य आणखी खुलवणारे आहे.
आजची सजावट पंढरपूरचे युवा उद्योजक युवराज मुंचलंबे ह्यांच्या वतीने आहे.
प्रशिक्षित, अनुभवी कर्मचारी परतल्याचा परिणाम?
गेल्या 3 आठवड्यापासून मंदिरात पारंपरिक अनुभवी, प्रशिक्षित नित्योपचार कर्मचाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेशास मंदिर समितीने बंदी घातली होती. त्याचा परिणाम देवाच्या पोशाखावर दिसून येत होता. नवख्या नित्योपचार पुजाऱ्याकडून उणिवा राहत होत्या. मात्र काल 16 ऑगस्ट रोजी मंदिर समितीने अनुभवी कर्मचाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेश परवानगी दिली. आणि आजची सजावट, देवाचा पोषाख अशा विलक्षण प्रकारे झाला आहे.