स्थानिक नागरिकांसाठी 1 दिवस विठ्ठल मंदिर खुले

शुक्रवारी दिवसभर मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर च्या नागरिकांना श्री विठ्ठल मंदिर समितीकडून खुश खबर देण्यात येत आहे. उद्या ( दि 27 रोजी) दिवसभर स्थानिक नागरिकांना दिवसभर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात मंदिर समितीने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

vdo पहा आणि चॅनेल subscribe करा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दि.14 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.16 नोव्हेंबर पासून दर्शनासाठी खुले करून देणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणीचे फक्त मुखदर्शन ऑननलाईन बुकींग करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उद्या शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 या वेळेत पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना श्री.विठ्ठल रूक्मिणीचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. मात्र पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक असलेबाबतचा पुरावा (आधारकार्ड/मतदानकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या पाष्र्वभूमीवर 65 वर्षापूढील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कार्तिकी यात्रा दि.26 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. कार्तिकी यात्रेला दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे दि.25 ते दि.27 नोव्हेंबर या कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांकडून श्रींचे दर्शन देण्याची मागणी होत आहे.

हे पत्रक मंदिर समितीचे मा.सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती.शकुंतला नडगिरे, डाॅ.दिनेशकुमार कदम. श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ. श्री.भागवतभुशण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!