३१ ऑगस्टपर्यंत विठ्ठल मंदिर बंद राहणार

लॉक डाऊन वाढल्याने मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊन कालावधी वाढवल्याने येथील श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे. या संदर्भात मंदीर समितीने प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.१७ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहे. दि.३१ जुलै अखेर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे.

राज्य शासनाने दि.३१ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यासह प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्हा व पंढरपूर शहरात देखिल मोठया प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. तसेच राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दि.३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.३१/०८/२०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, प्रथा व नित्योपचार, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारतीपर्यंतचे सर्व उपचार पुजा परंपरेनुसार करण्यात येत आहेत. सदरचे पत्रक श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने विचारविनियम करून एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्रक सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे

Leave a Reply

error: Content is protected !!