द्वादशीला ही विठ्ठल दर्शन नाहीच

मंदिर बंद ठेवण्याचा समितीचा निर्णय

निर्मनुष्य वाळवंट, महाद्वारात शुकशुकाट ! व्हीडिओ पहा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतील, त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोनाचा अधिक प्रसार होईल या मुळे माघी यात्रा द्वादशीच्या दिवशी सुद्धा विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद राहील असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कळवले आहे.

सध्या पंढरीत माघ यात्रा मर्यादित स्वरूपात साजरी होत आहे. आज माघ एकादशी च्या दिवशी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात शुकशुकाट दिसत आहे.

मात्र माघ शुद्ध दशमीच्या दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले केल्यास राज्यभरातून भाविक येतील आणि कोरोनाचा प्रसार वाढेल या भीतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, मंदिर समितीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने उद्या ( दि.24 ) रोजी ही विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहील, असे मंदिर समितीचे कार्य अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!