उद्यापासून 15 तास विठ्ठल मुखदर्शन

दररोज 3 हजार भाविकांना online नोंदणी करता येणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मुख दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून दररोज 15 तास दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर दररोज 3 हजार भाविकांना online नोंदणी करून मुख दर्शनासाठी सोडले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

यासंदर्भात मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या सूचनांनुसार भाविकांना मंदिर मुख दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे.

10 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला आणि 65 वर्षांवरील पुरुष, महिला वगळता इतरांना मुखदर्शन दिले जाणार आहे, त्यासाठी प्रत्येक तासाला 200 भाविकांना online बुकिंग करावे लागणार आहे. भाविकांची मागणी लक्षात घेऊन समितीने 15 तास दर्शन सुरू ठेवून 3 हजार भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. तरी भाविकांनी online बुकिंग करून दर्शनास यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!