हभप बंडातात्या कराडकर यांना मुक्त करा

व्यसनमुक्त युवक संघाची मागणी


माळशिरस : ईगल आय मीडिया

माळशिरस येथे व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने जेष्ठ किर्तनकार ह भ प बंडातात्या कराडकर यांना मुक्त करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना देण्यात आले.

या वेळी माळशिरस तालुक्यातील व्यसनमुक्त युवक संघाचे ऍड. लक्ष्मण मगर, तालुका अध्यक्ष श्री विजयसिंह पराडे, पोपटराव जमदाडे, सुरेश भोरे, दत्तात्रय मगर, माळशिरस म न से चे अध्यक्ष श्री सुरेश टेळे, कार्याध्यक्ष रोहित खाडे उपस्थित होते.

हभप बंडातात्या कराडकर यांना दिनांक 3 जुलै 2021 रोजी दिघी ( ता खेड जिल्हा पुणे ) येथे आषाढी वारी पायी चालत असताना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कराड येथील गोशाळा या ठिकाणी नजरकैदेत ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची त्वरित मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन माळशिरस तालुक्याचे तहसीलदार श्री जगदीश निंबाळकर यांना देण्यात आले.

गेली सुमारे तीन महिन्यांपूर्वी देहू येथील संत तुकाराम महाराज बीजे च्या वेळेला केलेल्या आंदोलना मध्ये ह भ प संतवीर बंडातात्या कराडकर यांनी शासनास विनंती केली होती की, आषाढी साठी कमीत कमी पन्नास वारकरी यांना पायी दिंडी सोहळा काढण्यास परवानगी द्यावी. मात्र शासनाने परवानगी न देेता तात्याना नजरकैदेत ठेेेवले.

या कैदेतून त्यांना मुक्त करावे, या मागणीसाठी माळशिरस येथे थोडक्या कार्यकर्त्यानी निवेदन देऊन वारकरी संप्रदायाची शिस्त दाखवून दिली.
वारी अगोदर ह भ प संतवीर बंडातात्या कराडकर यांची शासनाने मुक्तता केली नाही तर आषाढी वारीस परत आंदोलन करण्यात येणार असल्याचे मत श्री विजयसिंह पराडे यांनी बोलून दाखविले

Leave a Reply

error: Content is protected !!