वाखरीत महापुराचे पाणी : 31 कुटुंबे स्थलांतरित

6 घरांच्या भिंती पडल्या : दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भीमा नदी काठी नसूनही भीमेला आलेल्या महापुराचा तडाखा वाखरी गावातील नागरिकानाही बसला असून 31 कुटुंबे त्यातीक 98 लोक स्थलांतरित करण्यात आले आहेत. 6 घरांच्या भिंती पुराच्या2पाण्याने पडल्या आहेत. तर शेकडो हेक्टर पिकांचे महापुराने नुकसान झाले आहे. वाखरी येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाखरी हे गाव भीमा नदी पासून सुमारे 5 किलोमीटर दूर आहे तरीही दरवेळी भीमा नदीला पूर आला की गावातील शेती पाण्याखाली जाते आणि भीमेच्या पात्रात 2 लाख क्यूसेक्स पेक्षा अधिक पाणी आले की गावात पुराचे पाणी येऊन लोकांना स्थलांतरित करावे लागते.

यावेळी आलेल्या महापुराने गावातील 31 कुटुंबाना उघड्यावर आणले आहे. या लोकांना गावातील जिल्हा परिषद शाळेत आसरा दिला आहे. या लोकांच्या स्थलांतरासाठी ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र जाधव, गाव कामगार तलाठी समाधान शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे प्रयत्नशील आहेत.

गावच्या ओढ्यातून भीमेचे पाणी गावात येते. गावात सखल भागातून पाण्याने शिरकाव केला आहे. तसेच ओढ्याने पाणी मागे सरून सुमारे 1 किमी पर्यंत ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गावालगत असलेले दोन्हीही पूल पाण्यात गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामस्थांचे लक्ष पाण्याच्या परतीकडे लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!