वाखरीकराना आली आ.भारत नानांची आठवण

यल्लमा देवीची यात्रा : यात्रेच्या दिवशी सभामंडप भूमिपूजनास भारत नानांची उपस्थिती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आज वाखरीचे ग्रामदैवत यल्लमा देवीची यात्रा असताना वाखरी ग्रामस्थांना दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची आठवण प्रकर्षाने येत आहे. आजच्या दिवशी यल्लमा देवीच्या मंदिरासमोर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले होते आणि आजच्या दिवशी ( 27 नोव्हेंबर च्या रात्री ) एक महिन्यांपूर्वी भारत नानांनी जगाचा निरोप घेतला. यंदा कोरोना मुळे यल्लमा देवीची यात्रा रद्द झाली असली तरीही आ.भारत नाना भालके यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत.

वाखरी या गावावर आ.भारतनाना भालके यांचं विशेष प्रेम होते. आणि या गावाने त्या प्रेमाची उतराई म्हणून तिन्ही विधानसभा निवडणुकीत भारत नानांना भरघोस मतांची आघाडी दिली होती. गावात ग्राम दैवत यल्लमा देवीचे मंदिर चांगले असले तरी समोर सभा मंडप नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती. यात्रा काळात कापडी मंडप उभा करून सोय केली असली तरी एरवी येणाऱ्या भाविकांना क्षणभर बसण्यासाठी निवारा नव्हता. हे लक्षात घेऊन आ.भारत नाना भालके यांनी आमदार निधीतून मंदिरासमोर सभा मंडप मंजूर केला.

2 वर्षांपूर्वी यात्रेच्या दिवशीच या सभा मंडपाचे भूमिपूजन झाले होते. एक वर्षात सभा मंडप उभारून त्याचे लोकार्पण ही झाले होते. यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आ.भारत नाना वेळ काढून येत असत. यंदा मात्र कोरोना मुळे यात्रा रद्द करावी लागली आणि यात्रेला येण्यासाठी आ. भारत नाना हयात नाहीत. याची हुरहूर वाखरी कर आणि भाविकाना लागली आहे. आज यल्लमा देवीच्या यात्रेचा दुसरा दिवस असून आजच्याच दिवशी एक महिन्यांपूर्वी भारत नानांनी अखेरचा श्वास घेतला हा सुद्धा एक दुर्दैवी योगायोग असल्याचे गावात बोलले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!