वाखरीत कोरोनाचा विस्फोट !

एकाच कुटुंबातील 12 लोकांसह एका दिवसात 15 पॉझिटिव्ह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सुरुवाती पासून कोरोनाचा जोरदार मुकाबला करणाऱ्या वाखरीत शेवटी कोरोनाने जोरदार घुसखोरी केली असून एकाच कुटुंबातील 12 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये गावातील एकूण 15 लोक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
गावात आजवरचे एकूण कोरोनाग्रस्त रुग्ण 30 झाले आहेत आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे.

वाखरी हे गाव पंढरपूर शहरालगत असूनही आजवर कोरोनाचा गावात फारसा प्रादुर्भाव झाला नव्हता. दोन कुटुंबातील 6 लोक दीड महिण्यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मात्र गावात एकही पॉझिटिव्ह केस नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसात 10 लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कोरोनाचे बळी ठरले आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
शनिवारी गावातील तसेच पंढरपूर शहरातून आलेल्या अशा एकूण 110 लोकांची रॅपिड अँटीजन तपासणी केली. यामध्ये 23 लोक पॉझिटिव्ह आले. यातील एकाच घरातील 11 , मयत मुख्याध्यापक यांच्या कुटुंबातील 4 असे 15 लोक पॉझिटिव्ह सापडले तर 8 लोक पंढरपूर शहरातील पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे वाखरीत कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसत असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!