वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री साळुंखे यांची निवड

सौ कविता पोरे यांचा राजीनामा

पंढरपूर : ईगल आय न्यूज
वाखरी ता.पंढरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी धनश्री तानाजी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान सरपंच सौ कविता पोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मागील दीड वर्षे सरपंच म्हणून काम केल्यानंतर सौ कविता पोरे यांनी ठरल्यानुसार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी शिंदे हे होते.

सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याचा वेळेत धनश्री साळुंखे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी उपसरपंच सोमनाथ पोरे, मावळत्या सरपंच कविता पोरे, माजी उपसरपंच संग्राम गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे आदी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर कविता पोरे यांच्या हस्ते नूतन सरपंच धनश्री साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.

निवड जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे, माजी पं स सदस्य नानासाहेब गोसावी, सहकार शिरोमणी चे संचालक इब्राहिम मुजावर, संजय अभंगराव, माजी ग्रा पं सदस्य अभिमान साळुंखे, मच्छीन्द्र सलगर, सुभाष सुरवसे, जोतिराम पोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!