वाखरी ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा


गावातील दिव्यांग व्यक्तींचा केला सन्मान

फोटो
वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करण्यात आल. 


पंढरपूर
: eagle eye news

वाखरी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगाना मान सन्मान व सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा ठराव करून जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनश्री साळुंखे  होत्या.  दिव्यांग दिनानिमित्त  वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील सर्व दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशांत वाघमारे ,रणजीत जगताप ,तानाजी लटके, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भोजलिंग कोरे यांनी मनोगत व्यक्त केले.  दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना दिव्यांग संघटनेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. दिव्यांग क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल ओम चौगुले याचाही ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     यावेळी उपसरपंच  सोमनाथ पोरे, ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कविता पोरे ,छायादेवी लोखंडे ,संग्राम गायकवाड, विक्रम घोडके, वर्षा पवार ,चंद्रकांत चव्हाण, योगेश पांढरे ,संजय सलगर ,माजी उपसरपंच जोतीराम पोरे,  सुभाष सुरवसे ,लक्ष्मण गायकवाड , अभिमान साळुंखे ,एलआयसीचे डी ओ रंजीत जगताप, प्रशांत वाघमारे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भोजलिंग कोरे , सदस्य बापू जाधव, विष्णू पोरे ,शांताराम पोरे, रतन पोरे, जनाबाई पांढरे ,आदित्य पोरे ,प्रसन्नजीत कांबळे ,आदित्य माने, गोरख साळुंखे, तानाजी लटके, ओम चौगुले,ग्रामपंचायत कर्मचारी नाना पोरे,लक्ष्मण वाघमोडे, करण कांबळे, विठ्ठल लोखंडे, पांडुरंग गायकवाड ,सुभाष शिंदे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व दिव्यांग बांधव हजर होते.

Leave a Reply

error: Content is protected !!