वाखरी ग्रामपंचायतीच्या विकास कामाचे भूमिपूजन

गावातील सर्व अंगणवाडयांना टेबल आणि खुर्च्यांचे वाटप

फोटो
वाखरी येथील विकास कामाचे भूमिपूजन करताना विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार,  धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ पोरे आदी 

प्रतिनिधी : पंढरपूर

वाखरी ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व अंगणवाड्याना टेबल आणि खुर्च्या वाटप करण्यात आले. तसेच १५ व्या वित्त आयोगातील विकास कामाचे हि भूमिपूजन विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार, अनंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ पोरे आदी उपस्थित होते.

वाखरी ग्रामपंचायतच्यावतीने १५ वित्त आयोगातून गुरुवारी  इंदिरा गांधी नगर मधील रस्ता काँक्रेट करणे व गावातील सर्व ९ अंगणवाडीला टेबल व खुर्चीचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी   ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत चव्हाण, विक्रम घोडके,  संग्राम गायकवाड, बाळासाहेब लेंगरे,  सदस्या सौ.  कविता पोरे ,  वैशाली पांढरे, सौ वैशाली काळे, सौ वर्षा पवार, सौ उमाबाई जगताप, ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे,  अंगणवाडी सेविका सौ सुरेखा गोसावी व इतर अंगणवाडी सेविका,   माजी ग्रा. पं  सदस्य अभिमान साळुंखे,  सर्जेराव पांढरे, संजय सलगर,गजानन जगताप, सुनील गायकवाड,  भोजलींग कोर, कैलासगिरी  गोसावी, जयदीप बागल,  नाना पोरे, करण कांबळे , लक्ष्मण वाघमोडे,  सुभाष शिंदे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!