वाखरीच्या सरपंचपदाची १ सप्टेंबर रोजी निवड


धनश्री साळुंखे यांच्या निवडीची शक्यता

टीम : ईगल आय न्यूज


वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी होत असून सरपंचपदी धनश्री तानाजी साळुंखे यांच्या निवडीची शक्यता आहे. सरपंच कविता तुकाराम पोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाची निवड होणार आहे.

मागील दीड वर्षे सरपंच असलेल्या सौ कविता तुकाराम पोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नूतन सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार ११ ते १ वाजेपर्यंत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १ ते १. ३० वाजेपर्यंत अर्जाची छाननी, १.३० ते २ पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून गरज पडल्यास २ वाजता सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.


सरपंच पदासाठी सध्या धनश्री तानाजी साळूंखे यांच्या नावाची चर्चा असून हि निवड सर्वानुमते बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!