वाखरीच्या सरपंचपदी सौ कविता पोरे बिनविरोध

उपसरपंचपदी संग्राम गायकवाड यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. कविता तुकाराम पोरे यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड हे निवडून आले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

वाखरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक – शिवसेना आघाडीच्या 9 तर परिचारक – भालके – काळे आघाडीच्या 8 जागा निवडून आल्या होत्या. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. दोन्ही आघाड्यात अनेकजण इच्छुक होते, त्यामुळे कोण सरपंच होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.

सरपंच पदासाठी सौ. कविता पोरे आणि सौ. सीमा योगेश पांढरे यांचे अर्ज दाखल झाले होते. शेवटी सौ. सीमा योगेश पांढरे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने परिचारक गटाच्या सौ. कविता तुकाराम पोरे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंच पदासाठी संग्राम गायकवाड आणि संजय अभंगराव यांच्या लढत होऊन संग्राम गायकवाड 9 विरुद्ध 8 मतांनी विजयी झाले. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके उडवून जल्लोष साजरा केला.

Leave a Reply

error: Content is protected !!