पंढरपूर : ईगल आय मीडिया
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाखरीत ग्रामस्थांच्यावतीने गावातील जिल्हा परिषद,माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला. पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधीकारी विक्रम कदम यावेळी प्रमुख उपस्थित होते. तर सेवानिवृत्त शिक्षक एस. एन बनसोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकार शिवाजी शिंदे, शिक्षिका गवळी मॅडम, रेखा डोंगरे, शिक्षक बाळासाहेब मस्के, भारत पोरे याशिक्षकांसह गुलाब पोरे, नानासाहेब गोसावी, शिवाजी मदने, जोतिराम पोरे, चंद्रकांत पिसे, कृषी सहाय्यक रमेश भंडारे, अभिमान साळुंखे, संजय अभंगराव, सुरेश लोखंडे, रणजित जगताप, पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे, बंडू मदने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन सर्व राजकीय नेते, उमेदवारी अर्ज दाखल केलेले नागरिक, पदाधिकारी, सामाजिक अंतर राखून समोर बसले होते. संपूर्ण कार्यक्रम आचारसंहिता आणि कोरोनाचे सामाजिक अंतराचे नियम पाळून संपन्न झाला.
वाखरी ग्रामस्थांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दरवर्षी गावातील शिक्षिकांचा सन्मान केला जातो. यावर्षी सौ. ज्योती कोळी – परचंडराव, सौ. अशाबाई गाडे आणि अंगणवाडी सेविका सौ.वर्षा संतोष पोरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, तसेच त्यांचे जीवन चरित्रात्मक पुस्तक, शाल, पुष्पहार आणि। नारळाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, गावातील राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयात ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी , सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षण खुले केल्याचे सांगून अशा प्रकारे शिक्षकांना सन्मानित केल्याने शिक्षकाना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सौ अशाबाई गाडे, ज्योती कोळी, रेखा डोंगरे, श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतिराम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन धनाजी मस्के यांनी केले.आभार धनाजी पोरे यांनी मानले.