वाखरीत कोरोनाचा विस्फोट : 70 चाचण्यात 18 पॉझिटिव्ह केसेस

गावातील 45 लोक कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपूर : ईगल आय मिडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) गावात कोरोनाचा विस्फोट झाला असून आज ( शनिवारी ) तपासणी केलेल्या 70 लोकांपैकी तब्बल 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर गावात एकूण 45 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. गावांत अनेक भागात प्रतिबंधित झोन घोषित करून सील करण्यात आले आहे. एकूणच वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे वाखरी कर धास्तावले आहेत.

वाखरी गावात आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आल्या. यावेळी 70 लोकांची तपासणी केली असता त्यापैकी 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील 8 लोक हे वाखरी बाहेरचे असले तरी गावातील 15 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका कुटुंबातील 7 आणि अन्य एका कुटुंबातील 6 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गेल्या आठ दिवसांत गावातील एकूण 45 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर 65 एकर येथील कोविड केअर सेंटर, सामान्य रुग्णालय आणि शहरातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!