वाखरी येथील यल्लमा देवीची यात्रा रद्द

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील ग्रामदैवत यल्लमा देवीची पारंपरिक वार्षिक यात्रा यंदा कोरोना मुळे रद्द करण्यात आली असल्याची माहिती देवीचे पुजारी नारायण मनोहर पोरे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना पोरे म्हणाले की, येत्या 26 आणि 27 डिसेंबर रोजी यल्लमा देवीची पारंपरिक यात्रा आहे. मात्र यंदा कोरोना साथीचे मोठे संकट आले आहे, वाखरी गावात ही अनेक लोकांना कोरोना ची बाधा झालेली आहे.

हे लक्षात घेऊन यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही लिंब, गंध,माहेर, किच असे पारंपरिक विधी होणार नाहीत. त्यामुळे भाविकांनी यात्रेच्या निमित्ताने गर्दी करू नये.

तसेच दरवर्षी यात्रेसाठी अन्य गावातून येणाऱ्या आपल्या नातेवाईकांना ही यात्रा रद्द करण्यात आल्याचे कळवावे आणि स्वतःला , आपल्या कुटुंबाला आणि गावाला ही कोरोना पासून वाचवावे असे आवाहनही पोरे यांनी शेवटी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!