मृत्यू पावलेल्या पैकी 4 जण एकाच अभंगराव कुटुंबातील
मदत कार्य करताना लोक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटाची भिंत्त आज दुपारी अडीच वाजता कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या घाटाची भिंत कोसळली याखाली सुमारे 6 जण गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. या भिंत्तीच्या आडोशाला उभे राहिलेले काही लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भित्त पडल्यानंतर त्यांचा मोठा आक्रोश सुरु होता.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे जेसीबी व रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले घटनेचे वृत्त समजताच रुग्णवाहिका, जेसीबी बोलावून मदत कार्य सुरू केले आहे.
पंढरपूर येथे चंद्रभागा नदी तीरावर नवीन घाट बांधण्याचे काम सुरू आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या घाटाच्या कामाची भिंत आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली.