वारकरी संप्रदायाची भूमिका योग्यच : राज ठाकरे

कार्तिकी यात्रेसाठी महाराज मंडळी कृष्णकुंजवर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी  आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास आज दिले. वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समिती शिष्टमंडळाची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कृष्णकुंज येथे बैठक पार पडली.

आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने अनेक निर्बंध सोसत शासनास सहकार्य केले होते. मात्र आता बाजारपेठांसह सर्व गोष्टी खुल्या  होत असताना येत्या कार्तिकी  यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत या करिता  स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे, त्यानुसार यात्रा पार पाडावी, अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. त्यास प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत संप्रदायाची भूमिका राज ठाकरे यांनी समजून घेतली.

या बैठकीस मनेसेच बाळनांदगावकर,नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, राणा महारास वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, रंगनाथ महाराज राशीनकर, विठ्ठल महाराज चवरे, भरत महाराज आलीबागकर,श्याम महाराज उखळीकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!