वीर मधून नदीला पाणी सोडणार

नीरा-भीमा काठी सतर्कतेचा इशारा !

पंढरपूर : टीम ईगल आय

वीर धरण ८५ टक्केवर भरले आहे त्यामुळे येत्या २४ तासात वीर धरणातून नीरा नदीला कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा नीरा  विभागाने दिला आहे.
 नीरा खोऱ्यात आठ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे नीरेच्या खोऱ्यातील भाटघर 45.  टक्के , नीरा देवघर 40. टक्के, वीर 84.52 टक्के, तर गुंजवणी ६९ टक्के भरले आहे.

नीरेच्या खोऱ्यातील ४ हि धरणातून 52 टक्के इतका पाणी साठा झालेला आहे.  वीर धरण हे नीरा खोऱ्यातील आणि नीरा नदीवरील  सर्वात शेवटचे धरण आहे. याच धरणात ८४ टक्केहून अधिक पाणी साठा झालेला आहे. पूर स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नीरा उजवा कालवा विभागाने वीर धरणातून येत्या २४ तासात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदीकाठच्या खंडाळा, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर  तहसीलदार यांना  पत्र पाठवून नदी काठच्या लोकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी असे कळवले आहे.

दरवर्षी नीरा उजवा कालवा विभागातील लाभक्षेत्रात कालव्यातून पाणी सोडले जाते. त्यामुळे कालव्यास पाणी सोडण्याची मागणी नाही. तरीही नीरा उजवा कालव्यास ३९९ क्युसेक्सने गुरुवारी सकाळी पाणी सोडले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!