पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा द्या

सभापती रामराजे निंबाळकर यांच्या सूचना

मुंबई : ईगल आय मीडिया

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना सुरक्षा द्या अशा सुचना आज विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिल्या. विधान भवन च्या पहिल्या मजल्यावरील त्याच्या कार्यालयात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे विविध प्रश्ना बाबत बैठकीचे आयोजन करणेत आले होते.

या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्य मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काॅंग्रस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील, विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष सचिन जाधव, सरचिटणीस मनोहर सोनवणे, नाशिक विभागाचे समन्वयक राजेश मोरे, संघटनेचे मार्गदर्शक धनाजीराव पाटील, राजेश भोसले, सचिन सोनवणे , राम पाटील कोल्हापूर , रविंद्र सोनवणे प्रमुख उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा.सद्यस्थितीत त्यांच्या सेवा कशा प्रकारे अबाधित ठेवतां येतील या बाबत विचार करावा अशा सुचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिल्या.

तर , आऊटसोर्सिंग मुळे कर्मचारी यांची पिळवणूक होते. कामावर परिणाम होतो. आऊटसोर्सिंग आणू नका. अनेक कर्मचारी यांचे वय झाले आहे. कोविड सारखी परिस्थिती आहे. सहानुभूतिपुर्वक विचार करावा. असे आवाहन उमेश पाटील यांनी केले.

अर्थ विभागाचा सल्ला घेऊन फेरविचार – राज्यमंत्री संजय बनसोडे

या कर्मचारी यांचे बाबत आम्ही सकारात्मक आहोत. यांत कशा प्रकारे
मार्ग काढला येईल यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
या विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत आम्ही सकारात्मक असलेले राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.

आऊटसोर्सिंग ला विरोध राहिल- अध्यक्ष सचिन जाधव
आउटसोर्सींग एजन्सी नेमल्यामुळे कर्मचारी यांची पिळवणूक होते. १ नोव्हेंबर २०१२ चे शासन निर्णया नुसार पदे ठेवा. केंद्राने न सांगितलेली परंतू विभागाने सुचविलेली पदे रद्द करा. त्या खर्चात कंत्राटी कर्मचारी यांची पदे वाढवा. आम्ही उच्च न्यायालयच गेलो आहोत. आमचा विभागाने सहानुभूती पुर्वक विचार करावा. १८ वर्षा पासून लोक काम करीत आहेत.


सध्या कोविड मुळे अर्थ विभागाने आऊटसोर्सींग करणे बाबत सांगितले आहे. याबाबत कर्मचारी यांना कशा प्रकारे समायोजन करता येईल. यासाठी नियोजन करू. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. पदे कमी झाली आहेत. याचा सर्वकष विचार करावा लागेल. असेही विभागाचे अपर मुख्य संजय चहांदे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!