चिंचणी येथे जागतिक पर्यटन साजरा

फोटो : चिंचणी येथे पर्यटन दिनानिमित्त पिंपर या वृक्षाचे रोपण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


पंढरपूर : ईगल आय न्यूज

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त चिंचणी ता.पंढरपूर येथे पर्यटन दिन गप्पागोष्टी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयपीएस राहुल चव्हाण,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,पुणे ग्रामीण विभागाचे डी.सी.पी मितेश घट्टे, प्रांताधिकारी गजानन गुरव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अजय डडू आदी उपस्थित होते.


निसर्ग ग्रामीण कृषी किंवा धार्मिक पर्यटनाला औद्योगिक क्षेत्राप्रमाणे सुविधा देणे आवश्यक असून त्याचा स्वतंत्र इंडस्ट्री म्हणून विकास केल्यास धार्मिक ठिकाणी येणाऱ्या  भाविकांना, पर्यटकांना जादाच्या सुविधा मिळून त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे प्रतिपादन आय पी एस राहुल चव्हाण यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम म्हणाले की,   चिंचणी  लोकसहभागातून एक मॉडेल गाव व पर्यटन केंद्र म्हणून उभे राहत आहे. ही अत्यंत प्रेरणादायी  गोष्ट आहे. 


यावेळी पुणे ग्रामीण विभागाचे डी.सी.पी मितेश घट्टे यांनी जि. प .शाळा चिंचणीस एक संगणक संच भेट दिला आहे, त्याचा लोकार्पण कार्यक्रम ही शाळेमध्ये घेण्यात आला. तसेच  विक्रम कदम यांच्या हस्ते स्थानिक प्रजाती असणारे पिंपरण हे झाड लावण्यात आले. 

यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहन अनपट यांनी केले तर सूत्रसंचालन शशिकांत सावंत यांनी केले. आभार समाधान गाजरे  यांनी मानले. यावेळी चिंचणी गावासह अनेक पर्यटक यामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!