जागतिक महिला दिन : पंढरीत क्रांती महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर : ईगल आय मीडिया
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर येथी क्रांती महिला मंडळाने आपल्या घर कामासाठी येणाऱ्या महिलांचा विविध भेट वस्तू देऊन सन्मान केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचना लक्षात घेऊन क्रांती महिला मंडळाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रम टाळून हा आगळा वेगळा उपक्रम राबविला.
यंदा कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने महिला मंडळाने जागतिक महिला दिना निमित्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपापल्या घरी 7 मार्च रोजी घरात घरकामास येणाऱ्या कष्टकरी महिलांचा साडी, मिक्सर, फ्राय पॅन अशा संसारोपयोगी वस्तू देवुन त्यांचा सन्मान केला.
एरवी घरमालक आणि घर कामगार महिला यांच्या मध्ये असलेला दुरावा या निमित्ताने दूर झाला. या कष्टकरी महिला सुद्धा या सन्मानाने भारावून गेल्याचे दिसून आले.
मंडळाच्या अध्यक्षा सौ. सीमा सुरेश कोठारी, संस्थापिका सौ. राणी दोशी व सौ. निलम कोठारी, खजिनदार सौ. दिपा शहा, कार्यवाहक सौ. ज्योती शहा आदींसह मंडळाच्या 35 सदस्यांनी आपापल्या घरी हा सन्मान कार्यक्रम साजरा केला. क्रांती महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.