कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू

शास्त्र आणि वाणिज्य शाखेसाठी online फॉर्म भरावा लागणार

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक या फलकावर लावण्यात आले आहे.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून शास्त्र आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना online फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी लावून प्रवेश दिला जाणार आहे.

खालील लिंक वर mobile द्वारे भरावा. लिंक एकदाच भरावी.
विज्ञान लिंक:- https://forms.gle/BUBEPyLtJes9S1Go9 वाणिज्य लिंक:- https://forms.gle/QZSC3feBKXW322279

यंदा कोरोनामुळे इयत्ता 10 वी च्या परीक्षा झालेल्या नाहीत. बोर्डाने 9 वीच्या गुणांवर आधारित निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा पास होणाऱ्या आणि 90 टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता11 वी प्रवेश कशा पद्धतीने दिला जातो याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रवेश कार्यक्रम जाहीर केला आहे. 16 सप्टेंबर पासून इयत्ता 11 वी चे online वर्ग सुरू होणार आहेत. आजपासून ( दि.18 पासून ) 26 ऑगस्ट पर्यंत online फॉर्म भरण्याची मुदत आहेत. 27 ते 29 अर्जांची छाननी करून 30 ऑगस्ट रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि प्रवेश दिले जाणार आहेत.

पंढरपूर तालुक्यासह सोलापूर विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून चौकशी करीत आहेत. कला शाखेसाठी खुला प्रवेश असून शास्त्र आणि वाणिज्य शाखेसाठी मात्र ऑनलाइन फॉर्म भरून गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या निवड याद्या प्रसिद्ध केल्या जातील तसेच प्रवेश दिले जातील. 16 सप्टेंबर पासून इयत्ता 11 वीचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!