12 वी cbse परीक्षा निकाल आज

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12 विचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे. यावर्षी करोनामुळे  मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरली आहे. तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही. विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.

मुल्यांकनासंदर्भातील १३ सदस्यीय समीतीने  मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजन यापूर्वीच जाहीर केलं होतं. या नुसार १२ वीचा निकाल जाहीर करताना त्यामध्ये १० वीच्या गुणांचाही विचार करण्यात येणार आहे. दहावीच्या गुणांना ३० टक्क्यांपर्यंत महत्व या निकाला दिलं जाणार आहे. तसेच ११ वीच्या निकालाचं महत्व ३० टक्के आणि १२ वीमधील कमागिरीसाठी ४० टक्क्यांपैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये चाचणी परीक्षा, प्री बोर्ड एक्झामच्या गुणांचा विचार केला जाईल.

या वेबसाइटवर पाहता येतील निकाल cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in  कसे चेक कराल निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.होमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा, स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल, त्यानंतर पर्याय निवडा, त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल

निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं. सीबीएसईने १० वी आणि १२ वीला बाहेर बसलेल्यांची परीक्षा ऑगस्ट १६ ते सप्टेंबर १५ दरम्यान घेतली जाणार असल्याचं सांगितले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!