वाखरी आश्रमशाळेचा इ.दहावीचा ९७.७६ टक्के निकाल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा वाखरी ( ता.पंढरपूर) येथील माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ९७.७६ टक्के जाहीर झाला.

या परीक्षेस शाळेतुन एकूण ८६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य , ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व इतर ८ ऊत्तीर्ण झाले.

विद्यालयातून विकास नारायण नागणे ९२% ( प्रथम ) , पायल सौदागर जगदाळे ८८.६०% ( द्वितीय ), मनिषा भिमराव पोरे ८८% यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका कु. शमशाद बागवान, पर्यवेक्षक पी जी गायकवाड , शिक्षक संजय मोरे , माळी , भारत पोरे , संपत बनसोडे , सुनिल पवार , नितेश शिनगारे , महेंद्र चौगुले ,विक्रम बिस्कीटे व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

या ऊत्तुंग यशाबद्दल जवाहरलाल प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे , सचिव डाॕ मदन क्षीरसागर , डाॕ मंदार सोनवणे, डाॕ सौरभ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशाबद्दल सर्व स्तरातुन मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!