यशवंत भाऊ पाटील पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश

पंढरपूर : ईगल आय न्यूज

भोसे ( ता.पंढरपूर ) या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी भोसे चे सरपंच ऍड गणेश पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना ऍड.गणेश पाटील यांनी, सभासदांचा विश्वास हेच संस्थेच्या विकासाचे प्रतीक आहे, स्व.राजू बापूंनी जे आदर्श घालून दिलेले आहेत, त्यानुसारच संचालक मंडळ काम करीत असून स्पर्धेच्या युगात पतसंस्था नव-नवीन तंत्रज्ञानाचे माध्यमातून सभासदांना सेवा देण्याचे काम करीत आहे. सभासद हा संस्थेचा आत्मा असून सभासद व ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवूनच पतसंस्था धोरण आखत आहे, असा विश्वास पतसंस्थेचे मार्गदर्शक ऍड.गणेश पाटील यांनी व्यक्त केला.

संपन्न आर्थिक वर्षात संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला असून संस्थेला ६४ लाख ४२ हजार २६६ रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लभांश देण्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी रावसाहेब पाटील, एड. गणेश पाटील, शहाजीराव पाटील, राम पाटील, चांगदेव जमदाडे, जयवंत गावंधरे, विश्वनाथ भिंगारे, सोमनाथ थिटे, युवराज कोरके, विजयकुमार कोरके, नितीन कोरके, बाळासाहेब गावडे, वैजू गावडे, सुनिल तळेकर, बळीराम कोरके, अशोक गावडे, ईलाही मुलानी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!