रोहन परिचारक यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण संपन्न
टीम : ईगल आय मीडिया
श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांचा वाढदिवस श्रीपुर–महाळुंग परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित स्पर्धा पारितोषीक वितरण रोहन परिचारक यांच्या हस्ते येथे पार पडले. यावेळी बारामती सायकल क्लब चे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीनिवास वाईकर उपस्थित होते.
या निमित्त श्रीपूर –अकलूज– श्रीपूर सायकल राईड, बॅडमिंटन स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, महाळुंग यमाई माता येथील माकडांना अन्नदान, कोवीड सेंटर येथे अन्नदान आशा समाजोपयगी उपक्रमाचा समावेश आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – चि. अजिंक्य शिंदे व चि. अथर्व लाटे, द्वितीय क्रमांक – डॉ. विजय डहाळे व श्री. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, तृतीय क्रमांक – डॉ. दादासाहेब पराडे व श्री. गणेश कुलकर्णी. तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याने विशेष सत्कार चि. अजिंक्य शिंदे यांचा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात सुधाकरपंत परिचारक व श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पांडुरंग सायकल क्लबची स्थापना दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. सत्कारमुर्ती डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या सामाजिक कार्यक्रमाची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रोहन परिचारक यांनी सर्व सहभागी राईडर्सचे अभिनंदन केले. रोहन परिचारक, अँड. वाईकर यांच्या हस्ते सायकल राईडमध्ये सहभागी झालेल्या राईडर्सना प्रमाणपत्र व भेटवस्तु देवुन सत्कर करण्यात आला. तसेच सुपंत बॅडमिंटन स्पर्धे मध्ये विजयी संघाचा ट्रॉफी व बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला.
नव्याने स्थापन झालेल्या पांडुरंग सायकल क्लबच्या पदाधिका-यांची अध्यक्ष पदी – श्री. भुषण धाईंजे, उपाध्यक्ष पदी – श्री. राजु पवार, सचिव पदी – श्री.राहुल शिवाजी साठे यांची निवड करण्यात आली. यावेळी खेळाडु, सायकल राईडर्स, कामगार व परिसरातील प्रतिष्ठीत उपस्थित होते.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व अधिकारी, परिसरातील डॉक्टर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री. दत्ता नाईकनवरे यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. विजय डहाळे यांनी केले.