चार रस्त्यांच्या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर
पंढरपूर : eagle eye news
येवती गावातील महत्वाच्या चार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ शिवसेना नेते आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार, उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाला. राजू खरे यांनी पाठपुरावा करून येवती आणि परिसरातील चार रस्त्यांसाठी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ खरे यांच्याच हस्ते करण्याचा ग्रामस्थांचा आग्रह होता.
येवती ( ता. मोहोळ ) येथील भोंगाळे शेत ते तुंगत नाला रोडसाठी २०लाख रुपये, आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी भोंगळे शेत रस्ता यासाठी २०लाख रुपये, पाटोळे वस्ती ते भोंगाळे वस्ती रस्त्यासाठी २०लाख रुपये आणि येवती- पापरी रस्ता ते सचिन कवडे वस्ती रस्ता या कामासाठी २०लाख रुपये असा चार रस्त्यांसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजु खरे यांनी ८० लाख निधी उपलब्ध करून दिला.
याप्रसंगी येवती गावचे सरपंच बालाजी खुर्द, सर्जेराव दाजी चवरे ज्योतीराम गोडसे, पापरी गावचे सरपंच, सौदागर खडके, नेपतगाव सरपंच पांडुरंग फरकाळे, रामहिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, पाटकुल गावचे उपसरपंच गणेश नामदे, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी बंडलकर, धनंजय खरे किरण पाटोळे, योगेश भोंगळे, विजय खरे, मौला बागवान, शिवा पवार, तात्या खुर्द, विनोद खुर्द, शुभम शितोळे, संदेश रंदवे, समाधान यादव, संजय मस्के, समाधान बाबर, मधुकर शितोळे, कालिदा शितोळे, अविष्कार शिंदे, आप्पा शितोळे, आनंद राजगुरू, सुधाकर शितोळे, अण्णा गोडसे, अशोक पाटोळे, बाळासाहेब पाटोळे शामराव व्यवहारे, माजी सरपंच संतोष शितोळे, पोपट गोडसे, नवनाथ भंडलकर, सचिन शितोळे, राहुल नागटिळक, अंकुश खुर्द, चंद्रकांत खुर्द, मुकेश गोडसे, आनंद जाधव, संजय गोडसे, समाधान साठे, अनिल खुर्द, नाना नवगिरे,अरुंद गोडसे, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.