येवती तलाव ओव्हरफुल्ल : सांडव्यातून पाणी वाहू लागले

पंढरपूर :, ईगल आय न्यूज

आष्टी, येवती ता. मोहोळ येथील इंग्रजकालीन तलाव यंदा पावसामुळे ओव्हरफुल्ल झाला असून सांडव्यातून पाणी काढून दिले आहे. २३ द. ल. घ. मी . एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या या तलावाचा मोहोळ तालुक्यातील येवती, आष्टी, शेटफळ, पापरी,खंडाळी या गावांसह पंढरपूर तालुक्यातील रोपळे, बाभुळगाव आदी गावातील शेतीसाठी उपयोग होतो.


याच तलावावर आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर असून त्या योजनेत मोडनिंब, शेटफळ, बैरागवाडी, खंडाळी, कोन्हेरी, पाटकूल , पेनूर हि गावे लाभक्षेत्र आहेत. एकूण ४ हजार ७६९ हेक्टर लाभक्षेत्र आहे. तर ११८२ हेक्टर बुडीत क्षेत्र आहे. १८८३ साली म्हणजेच १४० वर्षांपूर्वी हा तलाव बांधून पूर्ण झालं असून तलावाच्या भरावयाची लांबी ३ हजार ८०० मीटर्स एवढी आहे. मोडनिंब,  माढा शहरासाठी या तलावातून  पाणी पुरवठा योजना चालू आहे.


मागील काही वर्षांपासून दुष्काळाच्या काळातही या तलावात उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते आणि तलाव भरून  घेतला जातो. यंदा मात्र उजनीच्या कालव्यासह पावसाच्या पाण्यामुळे तलाव भरला असून तलावाचा सांडवा काढून यंदा पाणी सोडून द्यावे लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!