कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया
अनकढाळ ( ता. सांगोला ) येथील अहिल्यानगर येथे पोलवर चढून विजेचे काम करीत असताना कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शुभम शितोळे असे मयत कामगाराचे नाव असून तो पोलवर चढून काम करीत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि शुभम यास विजेचा जबर धक्का बसून तो पोलवरच ठार झाला.
ही घटना आज ( दि.1 ऑगस्ट ) रोजी सकाळी ११:३० घडली आहे. विजेचा धक्का बसल्यानंतर शुभम खाली पडला नाही तर तसाच खांबावर लटकून राहिला होता, अखेरीस जेसीबी बोलावून त्यास खाली उतरवण्यात आले.
दरम्यान या घटनेची जबाबदारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन झटकत आहेत, असा आरोप नातेवाईक आणि घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी केला आहे.