टीम : ईगल आय न्यूज
14 ऑगस्ट रोजी सायंकाळी भीमा नदीच्या पाण्यात उडी मारलेला करण खंडागळे या युवकाचा मृतदेह चार दिवसांनंतर चळे हद्दीत भीमा नदीच्या पात्रात सापडला आहे.
१४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नवीन पुलावरून करण संजय खंडागळे ( वय २८ वर्षे, रा. लखुबाई मंदिराजवळ, पंढरपूर ) हा त्याचा भाऊ आणि मित्रासोबत गेला होता. त्यावेळी करणने पुलावरून नदीत उडी मारली होती. 4 दिवस शोध घेत असताना आज बुधववारी त्याचा मृतदेह चळे ता.पंढरपूर येथे सचिन बनसोडे – पाटील यांच्या शेताजवळ भीमा नदी पात्राच्या पाण्यात आढळून आला.
त्याच्या मृतदेहाची ओळख मयताची आई कांचन खंडागळे यांनी केली आहे. यासंदर्भात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदनशिवे हे करीत आहेत.