पंढरीत युवकाची राहत्या घरी आत्महत्या

पंढरपूर : ईगल आय न्यूज

येथील गुर्जर वाडा (गोविंदपुरा) भागात  राहणाऱ्या  गणेश नेमिनाथ कदम या 38 वर्षीय युवकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास  साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टांगाचालक असणाऱ्या गणेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केल्यानंतर त्याने लिहिलेली चिट्ठी सापडली असून आपण आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर2 त्यामध्ये आहे. 

  गणेश कदम याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या संदर्भात शहर पोलिसात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!