युटोपीयन ६.५० लाख टना पेक्षा जास्त गाळप करणार

8 व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न !

फोटो : युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ करिता आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


मंगळवेढा : ईगल आय मीडिया

चालू गळीत हंगामात युटोपीयन शुगर्स ने ६.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून क्रसिंग करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून सर्व ऊस उत्पादक हे नियोजित नोंदणी प्रोग्रॅम नुसारच कारखान्यास ऊस देतील असा विश्वास युटोपीयन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केला आहे.

कचरेवाडी (ता.मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ आज रविवार (दि.१० ऑक्टोबर) रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अत्यंत साधेपणाने पण उत्साही साजरा झाला
प्रारंभी कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर श्री.अनिल भोसले यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.


यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या चा हा आठवा गळीत हंगाम असून मागील सात ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केली आहे.

कारखान्याने या वर्षी २०० ट्रॅक्टर, १५० मिनी ट्रॅक्टर,व 20 बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या १५ ते१६ तारखेपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे. संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. लवकरच मोळी पूजन करून गळीत हंगामास सुरुवात होईल.


या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार, पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. तसेच कारखान्याच्या व्यवस्थापना मध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक(B.E. Mech., MBA Londan) हे मदत करतील अशी अपेक्षा उमेश परिचारक यांनी व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित सर्वांनीच या घोषणेचे मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून स्वागत केले.


सदर प्रसंगी रोहन परिचारक, प्रगतशील बागायतदार महादेव लवटे, सुरेश टिकोरे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!