शाळेत गुलाब फुलांनी स्वागत : विद्यार्थी भारावले !

अतिरिक्त ceo धोत्रे यांनी केली शाळांची पाहणी

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आज पाकणी (ता.उत्तर सोलापूर ) येथील नृसिंह विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत केले. गुलाब पुष्पाच्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले.


आज लाॅकडाऊन नंतर सुरू झालेल्या शाळांना भेटी देणेचे सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आज पाकणी येथील नृसिंह विद्यालयास भेट दिली. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, केंद्रप्रमुख विठ्ठल रजपूत , मुख्याध्यापक युवराज मुळे, शिक्षक हनुमंत जोडमोटे, समाधान शिंदे उपस्थित होते.

लाॅकडाऊन नंतर सोलापूर जिल्ह्यातील शाळा राज्य शासनाच्या आदेशा नुसार सुरू झाले आहे. त्या पुर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पारावरच्या शाळा सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला होता. ज्यांचे कडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या लाखात होती.

अतिरिक्त सिईओ यांनी केली शौचालयाची पाहणी !
पाकणी येथील नृसिंह विद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी शौचालय कसे आहे? स्वच्छता आहे का? वाॅशबेसीन आहे का? शौचालयात पुरेसे पाणी आहे का, हात धुणे साठी साबणाची सुविधा आहे का? विद्यालयात मास्कची सुविधा आहे का? सर्व बाबांची तपासणी केली. हे सर्व पाहून विद्यार्थ्यांही आवाक झाले.


अतिरिक्त सिईओ यांनी स्वत गुलाब पुष्प घेऊन आलेले पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक चकित झाले. सिईओ स्वामी यांचे संकल्पनेतून सुरू असलेल्या झाडा खालच्या शाळेस त्यांनी भेट देऊन लाॅकडाऊन मध्ये शिक्षकांनी शिकविलेला गृहपाठ अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांनी घेतला. पाढे, इंग्रजी मधील स्पेलिंग व कविता असे विविध प्रश्न विचारून मुख्याध्यापक व शिक्षकांना कोरोना नियंमांचे धडे दिले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

यानंतर धोत्रे यांनी वडवळ (ता. मोहोळ ) येथील वडवळ प्रशाला विद्यालयास भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी खास मास्क आणले होते. या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, उपस्थित होते. या शाळेत कोरोना बाबतचे नियम भिंतीवर ठळक पणे लिहिणेचे सुचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!