पंढरपूर : ईगल आय मीडिया
यंदाचा आषाढी एकादशीला पंढरीत वारकऱ्यांची दाटी होणार नसली तरी,मंदिर समितीने सर्व नित्योपचार, परंपरा यांची जपणूक त्याच उत्साहाने केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेली मंदिर रोषणाई यंदाही केली असून विठ्ठल मंदिर झळकले आहे. पुणे येथील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव दरवर्षी श्री विठ्ठल मंदिरावर विनामूल्य विद्युत रोषणाई करून देतात. त्यांच्या सहकार्याने यंदा देखील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या मनमोहक रोषणाईमुळे मंदिराचा सारा परिसर उजळून निघाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने ड्रोन च्या सहाय्याने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराचे चित्रीकरण केले आहे.
व्हीडिओ पहा आणि चॅनेल
subscribe करा