पुन्हा एकदा आमदार : रणजितसिंहानी करून दाखवलं

अकलूज : ईगल आय मीडिया

ते हट्टी आहेत, ते ताठर आहेत,त्यांच्या आग्रहामुळेच विजयदादा 2009 साली पंढरपूरमध्ये निवडणुकीला उभे राहिले आणि हरले, त्यांच्यामुळेच मोहिते – पाटील घराण्याच्या राजकीय प्रभावाला घर घर लागली, त्यांच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची घडी विस्कटली. असे एक ना अनेक आक्षेप मागील 10 वर्षात माजी खासदार, युवक नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत नोंदवले गेले.

जाहीर सभातून असे आरोपही झाले, वर्तमान पत्रातून लेख लिहून आले. मात्र, रणजितसिंह मोहिते – पाटील जराही विचलित झाले नाहीत. आरोप आणि आक्षेपांना उत्तर देण्याच्या, ते खोडुन काढण्याच्या प्रयत्नात गुंतले नाहीत.

राष्ट्रवादीमध्ये सुमारे 10 वर्षे त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यात आली, जिल्ह्यातील मोहिते- पाटील यांच्या प्रभावाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झाले. तरीही रणजितसिंह आपल्या पद्धतीने राजकीय वाटचाल करीत राहिले. जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शांत, संयमी स्वभावाचा गैरफायदा घेऊन अनेकांनी त्यांच्यावरच राजकीय वार केल्याचे जिल्ह्याने पाहीले.
आक्रमक, अभ्यासू, चाणाक्ष असलेले रणजितसिंह ही सर्व
राजकीय उपेक्षा, अनाठायी टीका शांतपणे झेलत उभा राहिले. आणि वेळ येताच सर्वांचे, सर्व हिशेब पूर्णही केले.

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला मानला जातो, मात्र, तो मोहिते – पाटलांचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
राष्ट्रवादीमध्ये मोठी घुसमट आणि राजकीय कोंडी झाल्यानंतर त्यांनी मोका गाठून ठोका दिला आणि मोहिते पाटलांचा राजकीय प्रभाव किती मोठा आहे हे राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिले.

मोहिते – पाटील पदासाठी भाजपमध्ये गेले या आरोपाला त्यांनी निरर्थक ठरवले आणि रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांना निवडून आणले. तर माळशिरस विधानसभा निवडणुकीत ही भाजपच्या चिन्हावर राम सातपुते यांना निवडूनही आणले. एवढं करूनही मागील 1 वर्षात तर मोहिते- पाटील घरात ना आमदारपद, ना खासदारपद. तरीही रणजितसिंह कार्यरत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकांच्या अडचणी जाणून घेत होते आणि सोडवत ही होते. 1 वर्षांपासून कोणतेही पद नसल्याने मग मोहिते पाटलांनी भाजपमध्ये जाऊन काय मिळवलं असं ही बोललं जाऊ लागलं. काहींनी तर एखाद्या कार्यक्रमात विजयदादा दिसले म्हणून त्यांच्या राष्ट्रवादी परतीच्या ही पुड्या सोडल्या. तरीही रणजितसिंह अविचल राहिले.
मोहिते – पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना, मोहिते पाटलांनी भाजपला दिलेल्या राजकीय योगदानाची परतफेड म्हणूनच भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. ते बिनविरोध निवडूूूनही आले. 18 मे रोजी आमदारकीचा शपथ विधी झाला.

त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून आक्षेपांचे, आरोपांचे वार झेलत असलेल्या रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा, राजकीय प्रभाव दाखवून दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते – पाटलांना आडवे जाणाऱ्यांना त्यांनी दाखवून दिले आहे की, मोहिते – पाटील हा ब्रँड आजही राज्यात चालतो.
जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहमतीच्या राजकारणाला बगल देत त्यांच्या पुढच्या पिढीने आक्रमक भूमिका घेतली आहे, अंगावर आला तर शिंगावर घेण्याचीही मोहिते पाटील यांची तयारी असते हेच गेल्या वर्षभरात मोहिते पाटील कुटुंबाने दाखवून दिले आहे.

राज्यात भाजपची सत्ता नसली तरीही रणजितसिंह यांचं आमदार होणं, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारं ठरू शकतं.
कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये रणजितसिंह यांनी स्थान मिळवले आहे.
दीर्घकालीन राजकीय इनिंग खेळण्याची क्षमता, जिद्द असलेल्या रणजितसिंह यांचं हे पाऊल राज्याच्या राजकारनात पुन्हा केलेला प्रवेश ठरणार आहे.
मुळातच रणजितसिंह यांनी आपले नेतृत्व कौशल्य यापूर्वीच दाखवून दिलेले आहे. राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम राज्याने पाहिलेले आहे. मात्र अंतर्गत कुरघोडी मुळे राष्ट्रवादी मध्ये रणजितसिंह यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न केले गेले. म्हणून त्यांची मागील 10 वर्षे पक्षांतर्गत संघर्षात गेली. आता त्यांनी नव्याने ईनिंग ला सुरुवात केलेली असून.
पुढच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आज घडीला रणजितसिंह मोहिते पाटलांनी सर्व राजकीय विरोधकांना आपल्या नेतृत्वाची धमक दाखवून दिली असून.
मोहिते पाटील ब्रँड कालही प्रभावी होता, आजही आहे आणि उद्याही असेल हेच सिद्ध केले आहे.

2 thoughts on “पुन्हा एकदा आमदार : रणजितसिंहानी करून दाखवलं

  1. राज्यात भाजपची सत्ता नसली तरीही रणजितसिंह यांचं आमदार होणं, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारं ठरू शकतं.

Leave a Reply

error: Content is protected !!