पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायत पोट निवडणुकीत आ. भालके गटाला हादरा देत परिचारक गटाने बाजी मारली आहे. भालके गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला नाही, परिणामी परिचारक गटाकडून कमल रावसाहेब चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
बाभूळगाव ग्रामपंचायत कालावधी नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त होत आहे. ११ सदस्य असलेल्या बाभूळगाव ग्रामपंचायतीवर भालके गटाचे सहा, तर परिचारक गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. यापूर्वीची साडे चार वर्षे भालके गटाची निर्विवाद सत्ता होती. तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच कुसुम उत्तम पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. कारण, त्यांच्याच गटातील मंगल दिगंबर शिंदे यांना शेवटचे एक वर्ष सरपंच पद देण्याचे ठरले होते. त्यानुसार उशिरा का होईना पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. परंतु सत्ताधारी भालके गटातील अंतर्गत गटबाजीमुळे दोन सदस्यानी परिचारक गटाच्या कमल रावसाहेब चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा दिला. उर्वरित कालावधीसाठी बाभूळगाव ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचा झेंडा रोवला. परिचारक गटाकडे गणेश दिलीप चव्हाण, अजिनाथ गणपत सरवदे, आनंदी संभाजी चव्हाण, मंगल तुकाराम मोटे, भक्ती सौदागर रणदिवे, शालन सत्यवान माळी असे संख्याबळ आहे.
याकामी पांडुरंग साखर कारखान्याचे माजी व्हा. चेरमन दिलीप चव्हाण, नितीन रावसाहेब चव्हाण, किरण कोरके, शहाजी चव्हाण, अमोल कोरके, बाळासाहेब लटके यांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब औसेकर, तलाठी दत्ता कोथाळकर, ग्रामसेवक सुरेश इंगोले, नागनाथ चव्हाण, मुन्ना चव्हाण, पोलीस पाटील आनंद कोळी यांनी काम पाहिले. महादेव चव्हाण, श्रीपाद चव्हाण, बलराज चव्हाण, लक्ष्मण अंबुरे, परमेश्वर चव्हाण, प्रसाद वसंत चव्हाण, माजी सरपंच महादेव चव्हाण, उमेश चव्हाण, शंकर चव्हाण, महादेव रुपणार, अमर पवार, प्रदीप कोरके, नागनाथ राजमाने, उद्धव चव्हाण, सुहास राजमाने, सीताराम माळी, रमेश माळी, भारत माळी, माजी सरपंच अनिल माळी, सुनील चव्हाण, हनुमंत चव्हाण, तुकाराम मोटे, पवण चव्हाण, शंकर पाटोळे, उद्धव सरवदे, हणमंत सरवदे, अशोक सरवदे, अरविंद सरवदे, प्रदीप सरवदे, विष्णू पाटोळे, शिवाजी पाटोळे, नागनाथ कोळी, दत्ता पाटोळे उपस्थित होते.