शिंदेंना धक्का ; माढ्याची निवडणूक एकतर्फी होण्याकडे वाटचाल : अभिजीत पाटलांचे बळ वाढले
https://www.youtube.com/live/YRw8uOzOaao?si=3azkLvu-dzv7YzxT
अरण येथील मेळावा या लिंकवरून पहा.
माढा : प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी अतिशय निकराची झुंज देत निवडणूक पूर्णपणे आपल्या हातात घेतली आहे. माढा तालुक्यातील निर्णायक ताकद असणारे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे ( अरण) आणि मागील निवडणुकीत ७० हजार मते मिळवणारे संजय कोकाटे यांनी अभिजित पाटील यान जाहीर पाठिंबा दिला आहे. अरण येथे झालेल्या भव्य पाठिंबा मेळाव्याने निवडणूक अभिजित पाटलांच्या बाजूने फिरली असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, ज्योती कुलकर्णी, भारतनाना पाटील, संजय बाबा कोकाटे, भारत आबा शिंदे, बाळासाहेब पाटील, राजाभाऊ गायकवाड, अनिल पाटील, मधुकर अण्णा देशमुख, बाबूतात्या सुर्वे, रामकाका म्हस्के, पोपट तात्या अनपट, रावसाहेब नाना देशमुख, बाळासाहेबतात्या ढवळे, बलभीम आप्पा लोंढे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, रंधवे सर, संजय मस्के, विलास बाप्पा देशमुख, गोविंदभाई देशमुख, ऋषिकेश बोबडे, जगदाळे दीपक आबा देशमुख, आनंद कानडे, भगत सर, विजय पवार, बेंबळे गावचे सरपंच सौदागर जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..
माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणार माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र श्री रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे.
अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
अशातच तसेच शेवट पर्यंत प्रयत्न करूनही तुतारी चिन्ह न मिळाल्याने अपक्ष लढण्याची नामुष्की ओढावलेल्या पुत्र रणजीत शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून यामुळे अभिजीत पाटील यांचा विजय सोपा मानला जात आहे.