सरपंच आणि सोसायटी चेअरमनसह अनेकांचे पक्षप्रवेश
पंढरपूर : प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी परीते,अकोले बु आहेरगाव, भुईंज, पालवन, अंकुबी, भटुंबरे, नारायण चिंचोली, ईश्वर वठार या ठिकाणी झंझावाती सभा संपन्न झाल्या. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या मीनल साठे गटाचे जाधववाडी विविध सोसायटीचे चेअरमन शिवाजी भाकरे, शिवाजीराजे कांबळे गटाचे संतोष वामन मुटकुळे, राजाभाऊ सलगर व तसेच सोलंकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पांढरे, यांनी अभिजीत पाटील यांच्या कार्यावर व कर्तुत्वावर विश्वास ठेवत येणाऱ्या काळामध्ये साथ देण्यासाठी विजय करण्यासाठी साथ देण्याची ठरवले आहे. त्यामुळे आम्ही अभिजीत पाटील यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, ही निवडणूक कारखान्याची नसून विधानसभेची आहे. विद्यमान आमदारांनी ऊस आणि पाण्यावरच राजकारण केले. यामुळे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करूनही तीस वर्षात कोणतीही विकास कामे झाली नाहीत. मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे, बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. दर्जेदार आरोग्य सेवा नाही. उच्च शिक्षणाची सोय नाही, बेरोजगारी वाढली आहे, नोकरीसाठी येथील तरुणांना बाहेरगावी जावी लागत आहे.
यावेळी अनेक वक्त्यांनी बोलताना सांगितले की, माढ्याच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अभिजीत पाटील यांना मतदार संघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले पाहिजे असा निर्धार करण्यात आला.