अभिजीत पाटलांकडून सहकार शिरोमणी सोबतच विधानसभेची साखर पेरणी

मुंडेवाढी येथील शरद मोरे, शौकत मुजावर तुकाराम मोरे यांचा अभिजीत पाटील गटात प्रवेश

पंढरपूर : eagle eye news

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गावोगावी सभासदांच्या भेटीगाठी प्रसंगी मुंडेवाडी येथे अभिजीत पाटील गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद अभिजीत पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व कल्याणराव काळे यांच्यात चांगलीच खंडाजंगी होताना दिसत आहेत.

मुंढेवाडी येथील युवक नेते श्री.शरद मोरे आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकतभाई मुजावर, मा.चेअरमन तुकाराम आण्णा मोरे यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला असून विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांची विधानसभेची साखर पेरणी सुरू असल्याचे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक घाडगे, माजी उपसरपंच सिद्धेश्वर घाडगे, संचालक दिनकर दाजी चव्हाण,रविंद्र मोरे ,मुरलीधर दाजी नवले,शरद मोरे,शौकत मुजावर,तुकाराम मोरे,जावेद मुजावर,माजी सरपंच श्रीरंग नवले,नागनाथ मोरे ,रायप्पा हळवणकर इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!