काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची अभिजित पाटील यांनी घेतली भेट

पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा

फोटो : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापुरात काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांचा सत्कारही केला.

पंढरपूर : eagle eye news

अभिजित पाटील यांनी मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर येथे त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, काँग्रेस चे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. तुकाराम मस्के, युवक काँग्रेसचे नितीन नागने आदी उपस्थित होते. यावेळी अभिजित पाटील यांनी शिंदे यांचा सत्कार हि केला. मात्र हे फोटो समाज माध्यमात प्रसारित होताच पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जोर चढला होता.

मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे यांनी त्यांच्याकडे हुरडा पार्टीचे नियोजन केले होते आणि मला त्या पार्टीचे निमंत्रण होते. त्या हुरडा पार्टीस जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आ. सुभाष देशमुख असे सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.


सोलापूर येथील मनोरमा परिवाराच्या हुरडा पार्टीला गेल्या नंतर तिथे माजी मुख्य मंत्री आणि जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली. त्यांनी चहा घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे आपण त्यांच्या घरी केवळ चहापानासाठी गेलो होतो. यामागे कोणतेही राजकीय कारण नव्हते असे प्रतिपादन अभिजित पाटील यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!