अनवलीच्या उपसरपंचपदी आ. भालके गटाचे भोसले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
अनवली (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आ. भालके गटाचे दिगंबर बाळू भोसले – पाटील यांची बुधवारी निवड करण्यात आली. उपसरपंच पदी भालके गटाचे सदस्य निवडले गेल्याने सर्वाधिक सदस्य असलेल्या परिचारक गटाला हा राजकीय धक्का मानला जात आहे.
महादेव सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली. दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांपासून गावचे सरपंच पद हे रिक्त असल्याने कारभार हा उपसरपंच पहात आहेत.
अनवली ग्रामपंचायतीमध्ये २०१५ मध्ये परिचारक गटाचे १० तर भालके गटाचा केवळ एक सदस्य निवडून आलेला होता. संतोष खुणे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. गेल्या साडेचार वर्षांपासून हे पद रिक्त आहे. बुधवारी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आ. भालके गटाचे दिगंबर बाळू भोसले पाटील यांना सात तर परिचारक गटाच्या मुनाबी शेख यांना चार मते मिळाली. उपसरपंच निवड प्रसंगी माजी उपसरपंच सिद्धनाथ भोसले, रामभाऊ भोसले, ग्रामसेवक महानवर, तलाठी राहुल गुंटाळ, लहू भोसले, संतोष पुणे, पिंटू भोसले, रुबाब शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.