बीड जिल्ह्यातील भाजपच्या 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे

मुंढे समर्थकांची नाराजी : भाजपला धक्के

टीम : ईगल आय मीडिया

बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात  प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे बीडमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले असून भाजपचे विविध पदाधिकारी राजीनामा देत आहेत. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. यामुळे नाराजीतून बीड जिल्ह्यातील सर्व 11 भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जात असतानाच पंकजा मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता.

मात्र यानंतर बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक भाजप 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिलेत. यापूर्वी 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. यामध्ये  भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!