तर पंढरपूर शहराध्यक्षपदी विक्रम सिरसट यांची निवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या भाजपच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी भास्कर कसगावडे यांची तर पंढरपूर शहराध्यक्ष पदी नगरसेवक विक्रम शिरसट यांची निवड झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये या दोन्ही निवडीचा समावेश आहे. हे दोन्हीही युवक नेते आ.प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपच्या शहर व तालुकाध्यक्ष पदी परिचारक समर्थकांची वर्णी लागली आहे.
भास्कर कसगावडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून लक्षणीय काम केले आहे तर विक्रम शिरसट यांनी गेल्या 7 वर्षांपासून एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून तसेच पालिकेच्या विविध समित्यांवर सभापती म्हणून काम केलेले आहे. युवकांचे चांगले संघटन आणि कार्यक्षम अशा दोन्ही निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांनी राजीनामा दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. तर भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोना मुळे निधन झाल्यापासून शहराध्यक्ष पदही रिक्त आहे. या निवडीकडे भाजपच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले होते.
आगामी पंढरपूर नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्ष्यात घेऊन आ.प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या तालुकाध्यक्ष पदासाठी भास्कर कसगावडे आणि शहराध्यक्ष पदासाठी विक्रम शिरसट यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार या दोन्ही पदाच्या निवडीची आज जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी घोषणा केली आहे.