महाराष्ट्र विधानसभेत अबकी बार, दो सौ पार

भाजपचा निर्धार : श्रीकांत भारतीय यांनी पंढरीत केला दावा


भाजपचे निरीक्षक श्रीकांत भारतीय यांनी पंढरीत श्री विठ्ठल दर्शन घेतले. यावेळी उपस्थित आ. कल्याणशेट्टी, आ. अवताडे, आ. सातपुते आदी 

पंढरपूर : eagle eye news

नाशिक येथे पक्षाच्या झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत २०२४ साली २०० हुन अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शिंदे – फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कामामुळे हे उद्दिष्ट साध्य होईल असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला. सोमवारी भारतीय हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आम. समाधान अवताडे, आ. राम सातपुते, प्रा. डॉ. बी. पी. रोंगे, प्रणव परिचारक, तालुकाध्यक्ष  भास्कर कसगावडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

महाविजय मिशन अंतर्गत २०२४ साली विधानसभेत २०० हुन अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आघाडी २०० जागा जिंकेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही एक नंबरला आहोत. आमी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही आम्ही पुढे राहू. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत  आमच्या समोर कसलेही आव्हान नाही, असा दावा भारतीय यांनी केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना भारतीय म्हणाले कि, राज्यातील जनतेने अडीच वर्षांचे आणि आता काम करीत असलेले सरकार पहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ती तुलना  करू शकते, त्या तुलनेचा आधारावर आम्ही सांगू शकतो कि, आम्ही शंभर टक्के २०० च्या वरती जिंकू शकतो. शिंदे – फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा निवडून येईल, असा विश्वास हि श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला. तसेच पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घेतील असेही भारतीय यावेळी म्हणाले. 

Leave a Reply

error: Content is protected !!